किल्ले इर्शाळगड
पनवेल पासून अगदी हाकेच्या अंतरावर असणार किल्ला म्हणजे किल्ले इर्शाळगड. मी आणि माझा मित्रा प्रफुल्ल आमचं एकमत झाले आणि ठरलं देऊच भेट इर्शाळगडला..!! मोठया जोशात आम्ही या मोहीमची तयारी केली. मोहिमेचा ठराव टाकला तेव्हा मावळे तयार होते ८ आणि मोहीमचे दिवशी जमले फक्त ५ 😃. काही व्यक्तीक कारणामुळे मोहिमेतून ३ शिलेदारनी माघार घेतली.
मोहीम - दिनांक १३-मार्च -२0२१, ठरलंय वेळेप्रमाणे लवकरच आम्ही सर्व निघणार होतो. सवयीप्रमाणे मोहीमचे रात्री ३-४ वेळा दचकून जाग आली आणि कसाबसा सकाळी ५ ला घड्याळ च्या गजर ने मोहिमचे श्रीगणेश केला. माझ्या मागोमाग आमच्या सौ. आणि मातोश्री यांना पण जाग आली आणि दोघींनी लगबगने मोहिमेसाठी मस्त चपाती, मेथी ची भाजी आणि शेंगदाणे ची चटणी ची शिदोरी बांधून दिली. मी रात्रीच बॅग व्यवस्थित भरून घेतली होती त्यात आता डबा आणि 4 लिटर पाणी सोबतीला घेतलं.
लॉकडउन मुळे सुस्त झालेलं शरीर आणि समोरील भली मोठी बॅग बघून माझी तर छातीचा दडपली. एव्हाना आमचं डोंबिवली चे शिलेदार स्वप्नील दुरगुडे यांचा फोन आला आणि निघाला की नाही.? हे विचारू लागला. ठरल्याप्रमाणे ठीक ६.३० ला सर्व जण कोपरखैरणे इथे भेटायचं ठरलं होत. आमचं मुलुंडचे शिलेदार कल्पेश शिरवडकर एव्हणं ठीक ६ वाजता भांडुप पंपिंग ला बाईक घेऊन पोचले होता आणि माझी वाट बघत थांबले होता. मोहिमेत अगदी शेवटच्या क्षणी सामील झालेलं मयूर जाधव माझी बाहेर नाक्यावर वाट बघत होतो. मी बॅग उचलून निघालो, त्या बरोबर आई आणि बायको चे नीट जा, जपून जा, गाडी सावकाश चालवा अश्या सूचना चा रतीब चालू होता. काळजी पोटी ते बोलत होते याची कल्पना होतीच. त्याने हो.. हो.. बोलत मी नाक्यावर आलो आणि गणपती बाप्पा ला वंदन करून मी मयूर ला सोबत घेऊन पुढील प्रवास ची सुरवात केली.
सकाळी ६ वाजता रस्त्यावर गर्दी कमी असल्यामुळे साधारण १५ मिनिट मध्ये आम्ही भांडुप पंपिंग ला पोचलो. वेळेच्या बाबतीत काटेकोर असणार कल्पेश बराच वेळ आमची वाट बघत होता. गाडी चालवत असताना प्रफुल्ल चे २ कॉल येऊन गेलं होते. त्याला कॉल केला असता "अरे बाबा कुठं पोचाल, या वाक्यावरूनच समजून गेलो होतो आता भेटल्यावर प्रफुल्ल आणि स्वप्नील शिव्याच लाखोली वाहणार 🤣🤣".
कल्पेश एकटाच गाडीवर होता, त्याच मागोमाग आम्ही पण निघालो आणि अगदी २० मिनिट मध्ये कोपरखैरणे ला पोचलो. साधारण ५ मिनिट मध्ये स्वप्नील आणि प्रफुल्ल पण आले. "किती रे वेळ लावल घाटकोपर वरून याला मी केव्हाच आलो आहे डोंबिवली वरून या पासून जी सुरवात झाली तीच शेवट &%₹#@% पर्यंत झाला".😆😘🤣
मोहिमेस पहिल्यांदाच आलेलं कल्पेश आणि मयूरची सर्वांशी ओळख करून दिली आणि पुढील प्रवासची सुरवात केली. वाटेत एका ठिकाणी गाडी मध्ये पेट्रोल भरून आम्ही पुढे मार्गक्रमण केलं.एव्हणं,आमच्या पोटात भुकेचं कावळे काव-काव करायला सुरवात झाली होती..पनवेल मागे जाउन बरंच वेळ झाला होता. आम्ही जुन्या मुंबई - पुणे रस्ता ने प्रवास करत होतो. रस्त्यानी जाताना एका हॉटेलच्या ठिकाणी बरीच गर्दी दिसली आणि आम्ही पण मग नाश्ता साठी तिथे थांबायचं ठरवलं.भुकेमुळं आमच्यामधील बकासुर असा काही जागा झालं होता की मेंदू वडा, इडली, ढोंसा, उत्तपा असे सर्वं मेनू खादाडलं नंतर शेवट मस्त अशा चहा ने केला.
नेहमी प्रमाणे थोडा फार अभ्यास केला होता कस जायचं यांचा तरी पण गूगल मॅप वर लोकेशन टाकून आम्ही पुढील प्रवास ला सुरवात केली.. बरंच वेळ जाऊनही अजून आपण कस पोचलो नाही ? आणि केलेलं अभ्यास तर सांगत होता "चौक" रेल्वे स्टेशन अगोदर डावीकडे च्या बाजूला किल्लेसाठी रस्ता आहे. गूगल मॅप मामा आम्हांला फसवणार होताच पण आम्ही वेळीच सावध झालो. तेथील नागरिक कडे रस्ता विचारून आम्ही किल्लेच्या दिशेने सुरवात केले. एका भल्या मोठया टेकडी(डोंगर ) मागे किल्ले इर्शाळगड लपून आम्हाला बघत होता.
निसर्गचा आणि उजव्या बाजूला असणार विस्तीर्ण असा मोरबे जलाशय यांचं आनंद घेत आम्ही शेवटी ट्रेक ला सुरवात होणाऱ्या वाडी (नानिवली गाव ) पाशी पोचलो. तिथे असणारे पार्किंग मधील गाड्या वरून अंदाज आला होत की किल्ले ला आपल्या बरोबर अजून बरेच जण भेट देण्यासाठी आलं आहे. गाडी पार्क करून आम्ही ट्रेक ला सुरवात केली. साधारण १० मिनिटच्या चालण्यानंतर समोर भला मोठा डोंगर लागलं आणि त्याचा अगदी डाव्या बाजूनी एक पाऊलवाट जात होती. माझं मन सांगत होत किल्ले कडे जाण्यासाठी हीच पाऊलवाट धरावी लागणार. पण कन्फर्म करणे गरजेचे होत. समोर टेकडीवर खेळणार पोरं कडे चौकशी केली असता त्यानी सांगितलं टेकडी चढून जावे लागणार. आम्ही सर्वांनी एकमेकांना बघितलं आणि हसायला लागलो. लॉकडउन मुळे सुस्त झालेलं शरीर आताच साथ सोडायला लागलं होत, आणि त्यात ती भली मोठी टेकडी चढायची होती. घड्याळात साधारण ९.३० झालं होते आणि मार्चच्या ऊन चांगली अंगाची लाही लाही करत होते. मयूर आणि कल्पेश मात्र मस्त निसर्ग चा आनंद घेत फोटोग्राफी करत होते.
विश्रांतीसाठी आम्ही २-३ वेळा थांबलो होतो बरोबर आणले चिक्की, शेंगदाणे यांचं आस्वाद घेत होतो. प्रत्येक जण स्वतः जवळील पाणी बॉटल कस संपेल आणि बॅग कशी हलकी होईल या विचारत एकमेकांना पाणी पिण्यासाठी आग्रह करत होते. (स्वार्थी साले 🤣🤣)
एक भलं मोठा ग्रुप आमच्या मागोमाग आला होत त्याचा कडे चौकशी केली असत समजलं ते रेंज ट्रेक करत होते इर्शाळगड ते प्रबळगड

️
️. त्यानं शुभेच्छा देत आम्ही पण पुढील वाटचालीस सुरवात केली अतिशय मंद गतीने आमचं प्रवास चालू होता एव्हणं डोंगर चढून आम्ही केव्हाच वरती आलो होतो आणि दूरवर इर्शालवाडी दिसत होती. आम्ही सुरवात केलं तिथपासून इर्शालवाडी अंतर साधारण २.५ किलोमीटर होते पण हेच अंतर पूर्ण करायला आम्हांला २ तास लागले 
ऊन भयंकर होते वाडी पासून जवळच विहीर होती आम्ही सर्वांनी आमच्या रिकाम्या पाण्याच्या बॉटल तिथे भरलंय आणि हात-पाय धुतलं. इर्शालावडी पासून वरती गडावरील अंतर हे साधारण २ किलोमीटर होते. फ्रेश झालं असल्यामुळे मस्त गप्पाचा फड रंगवत आम्ही पुढील वाटचाल चालू केली. एका ठिकाणी लिंबू सरबत विकणार छोटी टपरी लागली आणि स्वप्नीलला लिंबू सरबत पिण्याची लहर आली मग काय सर्वांनी थंडगार लिंबू सरबत आनंद घेतला. तिथेल लोकांचे उपजीविकी ची साधन खुप कमी आहे त्यानं मदत होण्यासाठी लिंबू सरबत पियचं लहर स्वप्नील ला आली हे मी कळून चुकलो होतो. वाटते लागणारे इर्शालदेवी चे दर्शन घेतला आणि आम्ही पुढे मार्गस्त झालो.
रस्ता आता थोडा खराब लागलं होता एकमेकांना सावकाश चल रे अश्या सूचना देत आमची अतिशय मंद गतीने वाटचाल चालू होती. साधारण १ तासानंतर गडाच माथा अगदी टप्यात आला होता. समोरचा भलं मोठा सुळका पाहून अंगात कुठून तरी ऊर्जा संचारली आणि आम्ही सर्व अगदी जोशात चालू लागलो.
सुळका चढण्यासाठी सुळक्याचं डाव्या बाजूने वाट आहे. आम्ही त्या वाटेनं पूढे चालू लागलो.गडावर मोठया प्रमाणात दगडी शिळा पडलेलं आहे आणि काही खूप धोकादायक पद्धतीने रस्त्यात आडवंय पडलेलं आहे. आम्ही जीव मुठीत घेऊन हळू हळू पुढे चालू लागलो. एका गर्द अश्या झाडाखाली आम्ही विश्रांती साठी थांबलो. पुढील रस्ता आता खूपच धोकादायक होता सरळ सोट असा पायरी मार्ग आम्हांला धरायचा होता.
विश्रांती नंतर प्रफुल्ल आणि स्वप्नील ने पायरी मार्ग च्या दिशेने मार्गक्रमण केले आणि मी, कल्पेश आणि मयूर ने जवळच दुसरीकडे जाणार मार्ग नक्की कोठे जातॊ यांचं शोध घेण्यासाठी त्या मार्गानी निघालो. साधारण ५ मिनिट मध्ये तो मार्ग संपला. तो गडाच शेवटचं भाग होता आणि डाव्या बाजूला खोल अशी दरी होती. आम्ही सर्वांनी मस्त फोटोग्राफी चा आनंद घेतलं. दूरवर असणारे कर्नाळा किल्ला, प्रबळगड, चंदेरी किल्ला, म्हसनाळ डोंगर यांचं दर्शन पण झाले .
आम्ही तिघे परत माघारी फिरलो आणि पायरी मार्ग च्या दिशेने निघालो . प्रफुल्ल आणि स्वप्नील पायरी मार्ग चढून आमची वाट बघत होते. आम्ही तिघे पण पायरी मार्ग लगबगीन चढू लागलो. पायरी मार्ग च्या अगदी उजव्या बाजूला एक पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहे. पायरी मार्ग चढून गेल्यावर एक ग्रामदैवत चे मंदिर लागते. तिथे असणारे एक आजोबा आम्हाला मार्गदर्शन करत होते आणि वरती गडावर काय काय आहे यांचं कल्पना देत होते. आजोबा मुंबईला शेवटचं कधी गेले होते आणि कसा होता त्याचं प्रवास यांचं वर्णन त्या आजोबा कडून ऐकत होत. ग्रामदेवत ची दर्शन करून आम्ही पुढील अवघड चढाई चालू केली. मंदिरापाशी आजोबा आम्हांला प्रोत्साहन देत होते. तिथे असलेलं शिडी च्या साह्यने एक - एक जण वरती जात होता शेवटी मी एकटा राहिलो. बरोबर आणलेलं मोसंबी थोडं आजोबा ना दिल आणि मी पण शिडी चा मार्ग चढू लागलो. वर पोचलो तर समोर होता गडावरील मुख्य आकर्षण म्हणजे "नेढं".
नेढं म्हणजे हवेचं प्रवहा मुळे निर्माण झालेले खडकमधील भलं मोठं भगदाड. नेढं पासून २ मार्ग लागतात डाव्या बाजूला असणार कठीण चढाई मार्ग चढून गेलं की समोर दिसतो छत्रपती शिवराय यांची छबी असणार ध्वज. आणि समोर अतिशय धोकादायक असा निमुळात मार्ग. आम्ही ध्वज पाशी छत्रपती शिवरायना वंदन करून माघारी परतयच ठरवलं. पुढील मार्ग धोकादायक असल्यामुळे आम्ही तिकडे न जाता नेढं पाशी आलो. नेढं पर्यंत येताना आम्हाला अगदी तारेवरची कसरत करावी लागली. नेढं पासून डाव्या बाजूला असणार उंच सुळका आम्हाला त्याचा कडे बोलावतं होता बॅग नेढं पाशी ठेऊन आम्ही सुळका च्या दिशेने निघालो. सदर सुळका चढण्यासाठी प्रस्तरोहन कला आणि रोप याची आवश्यकत आहे. आमच्या कडे दोन्ही पण नसल्यमुळे 
आम्ही सुळका च्या बाजूला मस्त फोटोग्राफी चा आनंद घेतलं.
गडावरून दिसणार भव्य-दिव्य राकट असा सह्याद्री चा आनंद घेत आम्ही माघारी निघणारच होतो तर माझी नजर तिथे असणारे एक छोटीश्य गुहा (गुहे सारखी असणारी कपार )कडे गेली. मनात आलं का नाही आपण आपल्या भोजनाचा कार्यक्रम या गुहे मध्ये करावा? मी आणि मयूर परत नेढं पर्यंत माघारी गेलो प्रफुल्ल, स्वप्नील यांना सोबत घेऊन आम्ही परत गुहे पाशी आलो. आणि मग जमलं फकडं असा जेवणच बेत. बरोबर आणल्या डब्यावर सर्वजण अगदी खादाड सारखे तुटून पडलं. कल्पेश ने आणलं दही आणि आम्रखंड ने तर अजून मेजवानी मध्ये रंगत आणली. आमच्या वरिष्ठ किल्लेदार ग्रुप बरोबर झालेलं गडकिल्ले मोहीम च्या आठवणी ला उजाळा देत आम्ही भोजन चा आनंद घेत होतो. भोजन झालं नंतर बरोबर आणलं प्लास्टिक पिशवी आणि वर्तमानपत्र यांना व्यवस्थित परत बॅग मध्ये भरले. वरिष्ठ किल्लेदार चा असणार दंडक की गडावर कुठं ही कचरा नाही करायचा याची तंतोतंत पालन केलं.
गडावर मोबाईल नेटवर्क चांगला असल्यामुळे आता मोहिमेला न आल्यालाना जळवण्यासाठी वॉट्सअँप विडिओ कॉल करून आम्ही करत असली धमाल आणि मजा यांचं चित्रीकरण दाखवलं. घरी आई ला आणि बायको ला फोन करून गडावर सुखरूप पोहोचले याची खबर पोचवली 😍😍 मनसोक्त असं जेवणमुळे आमच्या मधील कुंभकर्ण सुस्त झालं आणि मस्त अशी १ तास ताणून दिल सर्वांनी गुहे मध्येच.
गड फिरून झालं होत आणि आता नको असणार परती चा प्रवास सुरु करायचा होता. आम्ही सर्वांनी परतीची वाट पकडली, साधारण १ तास मध्ये आम्ही इर्शालवाडी मध्ये पोचलं. परत एकदा वाडी मधील विहीर वर फ्रेश होऊन पाण्याची बॉटल भरून आम्ही पुढील प्रवासासाठी सुरवात केलं. वाटेत काही बच्चे कंपनी भेटली आणि त्यांनी आमच्या कडे खाऊ ची मागणी केली. बरोबर आणलं शेंगदाणे, चिक्की त्यानं देऊन त्याचं निरोप घेऊन आम्ही पुढे चालू लागलो. सकाळी चढताना अतिशय भयंकर वाटणारी डोंगर आता उतरताना मस्त लागत होता.
परतीच्या वाटेत काही शाळकरी मुल भेटली . दररोज ते इर्शालवाडी - शाळा - इर्शालवाडी असं प्रवास करत असतात. त्याचा कडे बघितलं ,दररोज हा प्रवास कसा करत असतील आणि ते पण अनावानी ? शाळेत जाण्यासाठी लागणारी त्याची कसरत पाहून नक्कीच त्याना सलाम करावासा वाटतं 

डोंगर उतरून खाली आलो आणि पाठीमागे दिसणार इर्शाळगड जणू आम्हाला खुणावात होता की परत या माझ्या भेटीसाठी.. एक मस्त पैकी ग्रुप फोटो काढून आम्ही आमच्या पार्किंग केलं गाडीपाशी आलो आणि सुरवात झाली परतीच मुंबई प्रवास ची..😒
मोहिमीतलं काही क्षणचित्र :-

























छानच
ReplyDeleteSuperb bro
ReplyDeleteअप्रतिम लेख, जणू काही मे स्वतः अनुभवला इर्शाळगड।🙌🏻👌🏻
ReplyDeleteChan
ReplyDeleteUttam lihlays Mitra #gorakhgadchaSobati
ReplyDelete