Posts

कौल्यची धार घाटवाट

Image
 # 📅 दिनांक : १२ जुलै २०२६ # गर्दीपासून दूर... सह्याद्रीच्या कुशीतला एक अविस्मरणीय दिवस! ⛰️💚 १२ जुलै २०२६ रोजी आमचा मूळ प्लॅन होता कोथळीगड (पेठ किल्ला) सर करण्याचा. पहाटे उत्साहात निघालो आणि गडावर पोहोचलो. पण अपेक्षेपेक्षा खूपच जास्त गर्दी होती. अनेक जण ट्रेकर्सपेक्षा पर्यटक म्हणून आले होते. मोठमोठ्याने गोंधळ, शिस्तीचा अभाव आणि निसर्गाची काळजी न घेणारे काही लोक पाहून मन खिन्न झालं. गडाकडे जाताना परिसरात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी-विक्री आणि जमीन संपादन सुरू असल्याचंही दिसून आलं. भविष्यात या भागात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक विकास आणि पर्यटनाशी संबंधित उपक्रम वाढण्याची शक्यता आहे. विकास आवश्यक असला तरी तो सह्याद्रीचा नैसर्गिक वारसा, जैवविविधता आणि पर्यावरण यांचा समतोल राखूनच व्हायला हवा. अन्यथा, आज ज्या शांततेसाठी आणि निसर्गासाठी आपण या भागात येतो, ती ओळख हळूहळू हरवण्याची भीती आहे. सह्याद्री म्हणजे फक्त पर्यटनस्थळ नाही; तो आपला इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. प्रत्येकाने त्याचा आदर राखणं ही आपली जबाबदारी आहे. गडाचा काही भाग आणि परिसर पाहिल्यानंतर आम्ही एकमताने प्ल...

किल्ले इर्शाळगड

Image
पनवेल पासून अगदी हाकेच्या अंतरावर असणार किल्ला म्हणजे किल्ले इर्शाळगड. मी आणि माझा मित्रा प्रफुल्ल आमचं एकमत झाले आणि ठरलं देऊच भेट इर्शाळगडला..!! मोठया जोशात आम्ही या मोहीमची तयारी केली. मोहिमेचा ठराव टाकला तेव्हा मावळे तयार होते ८ आणि मोहीमचे दिवशी जमले फक्त ५ 😃. काही व्यक्तीक कारणामुळे मोहिमेतून ३ शिलेदारनी माघार घेतली.  मोहीम - दिनांक १३-मार्च -२0२१, ठरलंय वेळेप्रमाणे लवकरच आम्ही सर्व निघणार होतो. सवयीप्रमाणे मोहीमचे रात्री ३-४  वेळा दचकून जाग आली आणि कसाबसा सकाळी ५ ला घड्याळ च्या गजर ने मोहिमचे श्रीगणेश केला. माझ्या मागोमाग आमच्या सौ. आणि मातोश्री यांना पण जाग आली आणि दोघींनी लगबगने मोहिमेसाठी मस्त चपाती, मेथी ची भाजी आणि शेंगदाणे ची चटणी ची शिदोरी बांधून दिली. मी रात्रीच बॅग व्यवस्थित भरून घेतली होती त्यात आता डबा आणि 4 लिटर पाणी सोबतीला घेतलं. लॉकडउन  मुळे सुस्त झालेलं शरीर आणि समोरील भली मोठी बॅग बघून माझी तर छातीचा दडपली. एव्हाना आमचं डोंबिवली चे शिलेदार स्वप्नील दुरगुडे यांचा फोन आला आणि निघाला की नाही.? हे विचारू लागला. ठरल्याप्रमाणे ठीक ६.३० ला सर्व जण कोपरखै...